Type Here to Get Search Results !

देवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी सुनील पवार यांची निवड

सदगुरु रक्षा न्युजः कैलास पवार
देवळा (प्रतिनिधी): येथील शहरात सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यासाठी 'जयंती महोत्सव समिती'ची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सुनील पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, कार्यकारिणीत अनुभवी व तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
​आर.पी.आय.चे जिल्हा नेते शांताराम पवार, नगरसेवक कैलासभाऊ पवार आणि आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष कैलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी समितीच्या इतर महत्त्वाच्या पदांचीही घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने:
​उपाध्यक्ष: समाधान पवार
​खजिनदार: प्रदीप पवार
​उपखजिनदार: कल्पेश पवार
​या निवडप्रसंगी समाजातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात सुभान पवार, चंद्रकांत अहिरे, राजू जगताप, सनी पवार, महेश बच्छाव, राकेश पवार, राजरत्न पवार, वैभव पवार, रवी पवार, प्रशिक पवार, रितेश पवार, योगेश अहिरे, बंटी वाघ, मेहुल पवार, यश अहिरे, राकेश अहिरे यांच्यासह अनेक भीमसैनिकांनी उपस्थिती लावून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
​"यंदाची १३५ वी जयंती सामाजिक एकता आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून भव्य स्वरूपात साजरी केली जाईल," असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
​या निवडीबद्दल देवळा शहरात सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केला जात असून, लवकरच जयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments