Type Here to Get Search Results !

श्रीमती जे .आर. गुंजाळ विद्यालय, चांदवड येथे कवी कुसुमाग्रज जयंती ,मराठी गौरव दिन उत्साहात साजरा

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड
   चांदवड :श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड येथे कवी कुसुमाग्रज जयंती मराठी गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक महाले बी. आर. ज्येष्ठ शिक्षिका स्वाती निकम, सुनंदा चव्हाण सुनिता देवरे, मराठी विषय शिक्षक  कापडणे सर, अडसरे सर होते. मान्यवरांच्या हस्ते तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी विषय शिक्षक कापडणे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. विद्यालयाच्या गीतमंच व सातवीच्या विद्यार्थिनींनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. नववीची विद्यार्थिनी सोनाक्षी जाधव हिने विद्यार्थी मनोगत मराठी दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षक मनोगतात मराठी विभागप्रमुख अडसरे सर यांनी कुसुमाग्रज यांची साहित्यसंपदा तसेच मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक महाले सर यांनी सुंदर कविता गायन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य लोहकरे सर यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून *मित्र वनव्यामध्ये गारवा* ही कविता संगीतमय सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कलाशिक्षक सचिन पाटील यांनी मराठी दिनाचे सुंदर  फलक लेखन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता दिवटे यांनी केले आभार न्याहारकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments