Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात रंगपंचमी निमित्त नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळा संपन्न.....पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग कार्यशाळेचे पंधरावे वर्ष.....

सदगुरू रक्षा न्युज चांदवड
चांदवड:- येणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगांचा वापर न करता सुरक्षित नैसर्गिक रंगांचा वापर करावा. रासायनिक रंगांचा घातक परिणाम व नैसर्गिक रंगांचा फायदा विद्यार्थ्यांना माहिती व्हावा म्हणून येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे 'रंगोत्सव साजरा करु नैसर्गिक रंगांनी' यावर कार्यशाळा विद्यालयातील कला विभागाच्यावतीने घेऊन जागृती करण्यात आली अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
      बाजारात सहज उपलब्ध होणारे गडद रंग व यामध्ये असणारे रासायनिक पदार्थ व त्यापासून होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत. रासायनिक रंग विद्यार्थ्यांनी वापरू नयेत. रासायनिक रंगात कॉपर सल्फेट, क्रोमिअम, ब्रोमाइड, आरोमाईन या सारखी रसायने असतात यामुळे कर्करोग, फुफुसांचे विकार, त्वचाविकार, डोळ्यांचे विकार अशा अनेक दुष्परिणामांविषयी माहिती दिली. 
रासायनिक रंग गडद व पक्के असल्याने सहजासहजी निघत नाहित व पाण्याचा अपव्यय होतो यामुळे रासायनिक रंगाचा वापर करु नका. नैसर्गिक पर्यावरण पूरक रंग विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातून पाने, फुले, भाजी, फळे यापासून घरीच कोरडे व ओले दोन्ही स्वरुपात रंग तयार करावेत. विद्यार्थी शाळा व देशाचे भविष्य आहे त्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि रंग तयार करतांना विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेतून नवनिर्मिती करण्याचे कौशल्ये वाढते असे प्रतिपादन या कार्यशाळेत मार्गदर्शक करतांना कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांनी केले. या कार्यशाळेत बीट, पळसाच्या फुलांच्या पाकळ्या, हळद, वावडींग च्या बिया यापासून लाल नारंगी, हळदीपासून पिवळा रंग विद्यार्थ्यांसमोर बनवून दाखविण्यात आलेत. टॉमेटो, झेंडूच्या पाकळ्यापासुन पिवळा रंग, पानांपासुन हिरवा रंग, गोकर्ण फुलांपासून जांभळा रंग, पारिजातक फुलांपासुन नारंगी असे ओले रंग आणि राखेपासुन राखाडी, कोळशापासुन काळा व टाल्कम पावडर पासुन पांढरा, निंब व मेहंदी पानांपासून हिरवा असे कोरडे रंग दाखविण्यात आलेत. नैसर्गिक रंगात औषधी गुण व जंतुनाशक तत्व असल्याने त्वचेला याचा फायदा होतो, चकाकी मिळते आदी सर्व नैसर्गिक रंगांचे फायदे सांगितले. विद्यालयातील इयत्ता सहावीच्या आर्या शिर्के, आराध्या पाटील, रुद्र कबाडे, ओमकार पवार, आरुष पवार, आरव राऊत, रुद्र वाघ, स्वरा चव्हाण, श्रेया केदारे, मंजिरी रहाणे, अनुष्का भांबर आदी विद्यार्थ्यांनी पिठ व नैसर्गिक रंग वापरून तयार करून आणलेल्या ओल्या व कोरड्या रंगांची माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख, रवि आबड यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments