चांदवड : तालुक्यातील उर्धुळ येथील तुषार खंडेराव आवारे यांची नाशिक जिल्हा न्यायालय येथे सरळसेवा परीक्षेतून ज्युनिअर लिपिक पदी निवड झाली आहे.
आमदार डॉ राहुल आहेर यांच्या निधीतून , नगर परिषद चांदवड संचलित वाचनालय येथे आज भाजपा शिक्षक आघाडी चे प्रा. डॉ. सुरेश पाटील , भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाडवी , प्रा. उदय वायकोळे , शिक्षक आघाडी मंडळ अध्यक्ष विजय जाधव , पत्रकार सुनील सोनवणे यांचे हस्ते सदर यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत मार्गदर्शन केले.
सदर विद्यार्थी याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केलेला असून ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर चा जॉब करून रात्री वाचानायात अभ्यास करून यश संपादन केले आहे. या वाचनालयातून आजवर अनेक विद्यार्थी अभ्यास करून सरळ सेवा भरती मध्ये यश संपादन करीत आहे.
Post a Comment
0 Comments