मराठा समाजाने नव्या विचारांना स्वीकारणे काळाची गरज आहे. - प्रा. डॉ.. हंसराज भोसले मराठा समाज आवश्यकता वैचारिक क्रांतीची पुस्तकाचे शानदार प्रकाशन.
February 02, 2026
0
चांदवड: : "मराठा समाजाने स्वतःच्या प्रगतीसाठी तरी अनिष्ट प्रथा परंपरा यांना मूठ माती देण्याची गरज आहे मला वाटते प्राध्यापक अक्षय शिंदे यांनी आज महत्त्वाचा विचार करून प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे त्यामुळे आजच्या एकूण Creativity हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आहे " असे प्रतिपादन निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रोफेसर आणि पुरोगामी विचारवंत डॉ. हंसराज भोसले यांनी केले. चांदवड तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रा. अक्षय रायाजी शिंदे यांनी लिहिलेल्या मराठा समाज :.आवश्यकता वैचारिक क्रांतीची या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प संदीप महाराज यांनी केले. यानंतर प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की," आज मराठा समाजामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्यांसाठी एक उत्तम मार्गदर्शकाची भूमिका या पुस्तकाने बजावली आहे. सीए शांताराम ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव,प्राचार्य महेश वाघ, डॉ. आत्माराम .कुंभार्डे,मयूर शेळके, रोशन गांगुर्डे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रिया वाघाडे आणि अश्विनी शिंदे यांनी आपल्या कविता सादर केल्या. लेखक म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना प्रा. अक्षय शिंदे यांनी या पुस्तकाच्या प्रेरणा स्पष्ट केल्या." आजवर मराठा समाजामध्ये वाटचाल करताना ज्या ज्या काही अनिष्ट प्रथा परंपरा मला जाणवल्या आणि तरुणांच्या ज्या काही अडचणी मला दिसल्या त्यांनी स्व अनुभवातून या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला प्राध्यापक झाल्यानंतर या गोष्टीची जाणीव झाली की आजच्या परिस्थितीत आपण शिक्षक म्हणून जर प्रबोधनाची भूमिका घेतली नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही, तेव्हा या विचारांचा समाज स्वीकार करेल अशी मला निश्चितपणे खात्री आहे " प्रोफेसर हंसराज भोसले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमधून मराठा समाजाच्या संदर्भात आजवर साहित्यामध्ये जे काही विचार मांडले आहे त्याची साकारल्याने चर्चा केली. यानंतर अध्यक्षीय मनोगत माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी व्यक्त केले. कोतवाल साहेबांनी सांगितले की," या मराठी समाजाच्या परिस्थितीचा विचार आपल्याला बळीराजापासून करावा लागतो. अंतर्गत हेवेदावे आणि स्पर्धा यातून समाज कसा मागे पडत गेला आहे हे त्यांनी विविध उदाहरणातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुस्तकाचे प्रकाशन प्रोफेसर डॉ.तुषार चांदवडकर यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.मनोज पाटील यांनी केले. या समाज प्रबोधन पुस्तक सोहळ्यासाठी अनिल कोतवाल यांनी मंगल कार्यालय चे सहकार्य केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अनेक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच गावकरी आणि तरुण मित्र परिवार उपस्थित होते.
Tags
Post a Comment
0 Comments