Type Here to Get Search Results !

चांदवड नगर परिषदेत भाजप ने युती धर्म पाळला नाही. भाजपच्या आडमुठे पना मुळे महायुती तुटण्याच्या मार्गावर

सदगुरु रक्षा न्युज प्रतिनिधी, चांदवड
चांदवड : नगर परिषदेची निवडणूक भाजप शिवसेना महायुती म्हणून लढले. पॅनल च्या वाटाघाटीत शिवसेनेने १० जागांची मागणी केली होती. ४ जागांवर एकमत करून महायुती करते वेळी मा. आमदार श्री राहुल दादा आहेर यांनी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांना एक स्वीकृत नगर सेवक व उपनगर अध्यक्ष पद देण्याचा शब्द दिला होता. मनमाड नगर परिषदेत भाजप चा एकच नगर सेवक निवडून आला तरीही महायुती धर्म म्हणुन मा. आमदार श्री सुहास आण्णा कांदे यांनी भाजप ला उपनगराध्यक्ष पद व एक स्विकृत नगर सेवक दिला. 
चांदवड नगर परिषदेत महायुतीचा धर्म म्हणुन शिवसेना गटाने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही तसेच २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप गटाच्या विकास कामांच्या सर्व प्रस्तावांना सरसगट मंजुरी दिली वसहयोग दर्शवला.पण आज दिनांक: ३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेत विषय समिती निवडी दरम्यान शिवसेना गटाला एक समितीचे सभापती पद देण्याची स्पष्ट सहमती नाकारली. 
वरील सर्व घडामोडी मुळे आज शिवसेना गटाने विषय समितींच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला व सभागृहाचा त्याग केला. तसे लेखी निवेदन पिढासीन अधिकारी मा. श्री अनिल चव्हाण साहेब (तहसीलदार, चांदवड) यांना दिले.
भाजपने महायुती धर्म पाळला नाही. वरिष्ठांना गेल्या महिना भारत झालेल्या घटनांचा इतिवृत्त सादर करून शिवसेना गट चांदवड नगर परिषदेत पुढील वाटचाल ठरवेल असे गटनेते श्री संदीप तात्या उगले यांनी पत्रकारांना कळवले.

Post a Comment

0 Comments