Type Here to Get Search Results !

“माता सभेतून शिक्षणाबाबत सकारात्मक बदलाची सुरुवात "....... “आईच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोय”

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी, चांदवड
चांदवडः दिनांक 31/01/2026 रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व डॉ. चंद्रशेखर परदेशी, धोंडगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती चांदवड यांच्या सहकार्याने दरसवाडी (हिरापुर )येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माता सभा आयोजित करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका कापडणे मॅडम यांनी उपस्थित सर्व मातांचे स्वागत केले. त्यानंतर निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत वापरण्यात येणाऱ्या आयडिया व्हिडिओ कार्ड्स संदर्भात मातांचे अनुभव जाणून घेण्यात आले व त्यावर चर्चा करण्यात आली.
यानंतर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे अनंता वायसे यांनी “आमचे गाव” या उपक्रमाची सविस्तर माहिती मातांना दिली. तसेच प्रथमच्या माध्यमातून शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. गावामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या चिल्ड्रन क्लबद्वारे मुलांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य व आत्मविश्वास कसा विकसित केला जात आहे, याविषयी मातांना मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर माता गटांची भूमिका व जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. माता गटांनी आठवड्याला आयडिया व्हिडिओ कार्डच्या आधारे चर्चा कशी घ्यावी, त्या चर्चेवर आधारित कृती कशा राबवाव्यात व त्या कृतींचा उपयोग करून घरामध्ये मुलांसोबत विविध शैक्षणिक कृती कशा करून घ्याव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सभेमध्ये मातांना वर्कशीट्स बाबत माहिती देण्यात आली. घरातील उपलब्ध शैक्षणिक व जीवनोपयोगी साहित्याचा वापर करून मुलांसोबत कृती कशा घ्याव्यात, याचे प्रात्यक्षिक स्वरूपात स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच आयडिया कार्डवर आधारित चर्चा करून मातांना आयडिया व्हिडिओ कार्ड दाखवण्यात आले.
या व्हिडिओमध्ये प्रथमोपचार या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दैनंदिन जीवनात मुलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना अचानक दुखापत झाल्यास तात्काळ कोणती काळजी घ्यावी, याबाबत मातांना उपयुक्त माहिती देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका खैरनार मॅडम यांनी पाल्यांची स्वच्छता व आरोग्याबाबत मातांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
या माता सभेला मातांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या शिक्षणासोबतच आरोग्य व सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढत असल्याचे मत मातांनी व्यक्त केले.
या सभेस मुख्याध्यापिका खैरनार मॅडम, शिक्षक थोरमीसे सर, बच्छाव सर, कापडणे मॅडम, पवार मॅडम तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे अनंता वायसे, साक्षी कवात व मोठ्या संख्येने माता उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments