Type Here to Get Search Results !

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड
चांदवड: मुंबई-आग्रा महामार्गावरील मांगीर बेट (राहुड घाट) परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात झाला. मालेगावकडून चांदवडकडे जाणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.
​मिळालेली सविस्तर माहिती अशी की,
आज दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:४० वाजेच्या सुमारास मांगीर बेट येथे मोटरसायकल आणि ट्रक (क्र. MH12 HD8811) यांचा अपघात झाला. मालेगाव बाजूकडून चांदवडकडे प्रवास करत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात भास्कर गुलचंद मोरे (रा. सवंदगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.

            ​देवदूत ठरली रुग्णवाहिका
​अपघाताची माहिती मिळताच राहुड घाट परिसरात तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नानीज) यांची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता जखमी भास्कर मोरे यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे जखमीवर तातडीने उपचार सुरू होऊ शकले.
​या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments