चांदवड - शासकीय रेखाकला परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत वाढीव गुणांचा फायदा होतो तसेच तंत्रशिक्षण व कला, उच्चकला अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या परीक्षा विचारात घेतल्या जातात. कलाशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाने यश संपादन केले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या या एलिमेंटरी परीक्षेत विद्यालयातील १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यालयाचा १०० टक्के निकाल जाहीर झाला असून परीक्षेत अ श्रेणीत आयेशा इब्राहिम पटेल,चैतन्य काशिनाथ अहिरे,रोहिणी भाऊसाहेब हिरे,श्रुती योगेश सोनजे या विद्यार्थ्यांनी तर ब श्रेणीत 41 विद्यार्थ्यांनी आणि उर्वरित 82 विद्यार्थ्यांनी क श्रेणीत यश संपादित केले.
इंटरमिजियट परीक्षेत विद्यालयातील १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यालयाचा १०० टक्के निकाल जाहीर झाला असून परीक्षेत अ श्रेणीत परमेश्वरी दिगंबर शेळके, प्रतीक्षा भाऊसाहेब सोनवणे, साईराज प्रदीप रोकडे, श्रेया बाळू गायकवाड, स्वरा संजोग शिवले, तेजस्विनी शिवाजी पवार या विद्यार्थ्यांनी तर ब श्रेणीत सव्वीस विद्यार्थ्यांनी आणि उर्वरित 73 विद्यार्थ्यांनी क श्रेणीत यश संपादित केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे उपमुख्याध्यापक देवेंद्रराजे पर्यवेक्षक रामचंद्र पाटील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सहकारी यांनी कौतुक केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख, रवि आबड यांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments