Type Here to Get Search Results !

काळाचा घाला: चांदवड-मनमाड रोडवर भीषण अपघात; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

 सदगुरू रक्षा न्युज : चांदवड प्रतिनिधी
चांदवड:चांदवड-मनमाड रस्त्यावर आज सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला असुन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून, आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.
​ 

Post a Comment

0 Comments