Type Here to Get Search Results !

चांदवड शासकीयआय टीआय मध्ये अल्पमुदत अभ्यासक्रमाचे उद्घाटन

सदगुरू रक्षा न्युजः उपसंपादक संजय जाधव
-------------------+++++++---------------
चांदवड : राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ झाला . या पार्श्वभूमीवर चांदवड येथील महाराजा सुरजमल  जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे यांनी दिली. यामध्ये टू व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन, लाईट मोटार व्हेइकल डायव्हर, फिटर फेब्रिकेशन, एलईड़ी लाईट रिपेअर, सोलर इस्ट्रॉलेशन टेक्नीशियन, डिजीटल मित्रा , टुरिझम कोऑडीनेटर असे आठ अल्पमुदतीचे या व्यवसायांचा अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे . यावेळी कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य भाऊसाहेब पगार ,गंगाधर सोनवणे , अँड अभिलाषा दायमा , श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे , सोमनाथ जगताप , गट निर्देशक योगेश जोशी व निर्देशक , निर्देशिका व कर्मचारी आदी उपस्थित होते . कोमल बोराडे यांनी सूत्रसंचालन केले . तर आभार सोनाली भंडारी यांनी मानले .


Post a Comment

0 Comments