चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या विद्यार्थांनी तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
चांदवड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा 3 व 4 सप्टेंबर 2025 रोजी वडाळी भोई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय सुमारे 35 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि मैदानी स्पर्धेमध्ये विविध प्रकारांमध्ये सहभाग घेत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
14 वर्ष वयोगटाखालील 17 वर्ष वयोगटाखालील 19 वर्ष वयोगटाखालील मुले नवनाथ कैलास पवार 800 मी धावणे प्रथम क्रमांक, चैतन्य संजय पाटील 1500 मी धावणे प्रथम क्रमांक, अर्णव प्रशांत जाधव 100 मी धावणे अडथळा शर्यत प्रथम क्रमांक, आदित्य सोमनाथ बच्छाव 100 मी धावणे अडथळा शर्यत द्वितीय क्रमांक, नवनाथ कैलास पवार 400 मी धावणे द्वितीय क्रमांक, चैतन्य संजय पाटील 3 कि.मी. धावणे तृतीय क्रमांक, रोहित अमोल जाधव गोळाफेक द्वितीय क्रमांक, प्रेम सुनील बिरार गोळा फेक तृतीय क्रमांक, सुरज संदीप गांगुर्डे गोळाफेक द्वितीय क्रमांक, तर 14 वर्ष वयोगटाखालील 17 मुली मध्ये
रुची महेंद्र कंकरेज गोळाफेक प्रथम क्रमांक, आयुष्या जुनेद बागवान 200 मी धावणे द्वितीय क्रमांक, गायत्री ज्ञानेश्वर आहेर 400 मी धावणे द्वितीय क्रमांक, 4×100 मी रिले द्वितीय क्रमांक, सानवी गौतम गांगुर्डे 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक, शुभांगी संदीप दवंडे तृतीय क्रमांक, अंजली प्रल्हाद यादव 600 मी धावणे तृतीय क्रमांक पटकावत सुयश संपादित केले आहे.
यशस्वी सर्व खेळाडूंना उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्यासह विद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख श्री दत्ता ठाकरे श्री महेश देवरे श्री युवराज ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या अतुलनीय कामगिरी बद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी विद्यार्थी आणि विद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments