Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी दिवस...शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह चांदवड येथे ' विश्व आदिवासी दिवस ' पारंपरिक पद्धतीने साजरा...

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः  भाजपा आदिवासी मोर्चा कडून आदिवासी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व मातोश्री अहिल्यादेवी होळकर चरित्र ग्रंथ देऊन सत्कार "
 
            चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात सालाबाद प्रमाणे ' विश्व आदिवासी दिवस ' पारंपरिक पद्धतीने व आदिवासी नृत्य सादर करत साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
     
       याप्रसंगी भाजपा आदिवासी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष संजय पाडवी यांनी प्रास्ताविक केले. चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी अध्यक्षीय स्थान स्विकारले, चांदवड मंडळ अध्यक्ष मनोज शिंदे व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुरेश पाटील सर व प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व जागर होळकरशाहीचा उपक्रमांतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांना मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथ सस्नेह भेट देण्यात आले. 
        सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणा-या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी सन्मानीत केले. राज्य परिषद सदस्य मोहन काका शर्मा , राष्ट्रपती पारितोषिक सन्मानीत अशोक काका व्यवहारे, सुनील डुंगरवाल, सुभाष काका कोल्हार, युवा उद्योजक किशोर क्षत्रिय, पत्रकार सुनिल सोनवणे, वसंत चव्हाण, वर्धमान पांडे, महेश खंदारे, मुकेश आहेर, खुशल ललवाणी, संतोष ढोमसे, महेंद्र कर्डीले, छायाचित्रकार पिंटू राऊत, मंगेश कंकरेज, ॲड. सचिन कुलकर्णी, ॲड. कल्याणी कुलकर्णी, राहुल हांडगे, पत्रकार संजय जाधव, यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले.
            वसतिगृहाचे अधिक्षक श्री. अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर, श्री. जे. आर. उबाळे , स्मिता जाधव, राजेंद्र जगताप, यांनी शिस्तबद्ध व कौतुकास्पद नियोजन केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या भूषणावह वर्तनाने  तसेच वसतिगृहातील स्वच्छता व सुंदरतेने मान्यवर प्रभावित झाले.

Post a Comment

0 Comments