Type Here to Get Search Results !

चांदवडला होळकरवाडा येथे लिंगायत समाज महिला मंडळ सदस्यांच्या शुभहस्ते महाआरती...

 लोकमाता  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त  होळकरवाडा  (रंगमहाल) येथे रविवार ( दि. ०३ ऑगस्ट ) लिंगायत समाज महिला मंडळ सदस्यांच्या शुभहस्ते महाआरती करण्याचा मान देण्यात आला. 
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे प्रमुख प्राचार्य दत्तात्रय बारगळ यांच्या संकल्पनेतून  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत डॉ. वर्षा  चौरे लिखित " पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर " या चरित्र ग्रंथांचे  उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना वाटप करण्यात आले   सदरच्या कार्यक्रमास... निर्मलाताई देशमुख, निमाताई कबाडे, वंदनाताई जंगम, नीताताई जंगम, सुनिता कबाडे, पुनम लोहारकर, मोहिनी देशमुख, चंदना कबाडे, सीमा कबाडे, गौरी कबाडे, पल्लवी हिंगमिरे, दर्शना शेटे, नीता हिंगमिरे, रोहिणी जंगम, सपना जंगम आदी महिला उपस्थित होते.
            तसेच जेष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, राजेंद्र झांबरे, बाळा पाडवी, उपस्थित होते. महाआरतीचे पौरोहित्य अरूण गुरू दीक्षित यांनी केले.

Post a Comment

0 Comments