चांदवड : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ .ना.का.गायकवाड विद्यालय उसवाड मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली.प्रसंगी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भारतमाता,* *झाशीची राणी लक्ष्मीबाई,महात्मा गांधी यांच्या वेषभूषा हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले.विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय,वंदे मातरम यासारख्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला.*
*त्यानंतर जिल्हा परिषद शाळा उसवाड व ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमासाठी मंचावर शालेय समिती अध्यक्ष केदु पाटील बच्छाव,अशोक दादा गायकवाड,देवाजी गायकवाड,निवृत्ती गायकवाड, लहाणू शिंदे,आप्पा शिंदे,भिलाजी आहेर,देवमन पवार,रामनाथ पवार,रावसाहेब गायकवाड ,माता पालक* *समितीच्या उपाध्यक्षा मनीषा गायकवाड ,सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष कौतिक पवार ,सर्व सदस्य,देश सेवेत कार्यरत असणारे श्रेयस पवार ,माजी विद्यार्थी मोहन पवार,उसवाड गावातील महिला पोलिस मीनाताई गायकवाड ,जेष्ठ नागरिक ,पालक उपस्थित होते.
प्रसंगी देवचंद शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करण्यात आले.राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महिला पोलीस मीनाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच अण्णा शिंदे यांच्या हस्ते स्काऊटगाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी विद्यालयाचे गीतमंच यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत,ध्वजगीत सादर केले.याप्रसंगी जेष्ठ शिक्षक रघुनाथ सूर्यवंशी यांनी अमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन सशक्त भारत घडविण्याचे आवाहन केले.
उपस्थित सर्वांना मुख्याध्यापक रमाकांत मोरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावातील नवसाक्षर हिरामण गायकवाड यांचा देखील सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी मोहन पवार यांनी विद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीत कवायत (पंचरंगी कवायत) देखील सादर केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समितीचे प्रमुख रघुनाथ सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.*
Post a Comment
0 Comments