चांदवडः.१५ऑगस्ट २०२५ रोजी काजीसांगवी विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या साहाय्याने सुंदर अशा घोषणा देत काजीसांगवी गावातून प्रभातफेरी काढली.
काजीसांगवी ग्रामपंचायत येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून,सर्वांनीच नशामुक्त भारत प्रतिज्ञा घेतली.
यानंतर शहीद स्मारक येथे स्मारकास मानवंदना देऊन प्राथमिक शाळेतही सर्वांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित झाले. व प्रभातफेरी विद्यालयाच्या प्रांगणात पोहचली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांनी प्रास्ताविकातून आजच्या या पवित्र तथा मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ,स्वातंत्र्य दिन हा आला नवचैतन्य घेऊनी, असे विचार मांडले.
आजच्या या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वजाचे पूजन श्री.पुंजाराम पा.ठाकरे यांनी केले व ध्वजारोहण चांदवड येथील पोलिस श्री.बच्छाव दादा यांनी केले.यावेळी गितमंचणे सुंदर असे राष्ट्रगीत,राज्यगीत व ध्वजगीत गायन केले.
यानंतर भारत स्काऊट गाईड ध्वजपूजन श्री.दिनकर पा.शिंदे यांनी केले तर ध्वजारोहण श्री.बाबासाहेब पा.ठाकरे यांनी केले यावेळी श्री.खुटे सर यांनी त्यांना दिक्षा दिली.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे संचालन केले. कवायतीचे उदघाटन श्री.शरदजी सोनवणे यांनी तोफेस मानवंदना देऊन केली.आजच्या या सोहळ्या निमित्त शालेय विद्यार्थ्यांनीही श्रीमती पाटील एम.बी.यांच्या मार्गदर्शनाने,लेझीम,दंबेज व बॉटल साहित्य घेऊन देशभक्तीपर गीताच्या सुरात सुंदर अशी कवायत केली व सर्व शालेय वातावरण राष्ट्रीय सणानिमित्त मंत्रमुग्ध केले, उपस्थित सर्वांनीच विद्यार्थी व शालेय परिवाराचे कौतुक करून बक्षिसेही दिली.
आजच्या या स्वातंत्र्यदिनी 'विद्यालयात उपस्थित सर्वांनीच व्यसनमुक्तीची व सुरक्षिततेचि प्रतिज्ञा घेतली व नाशमुक्त भारत होण्यासाठी संकल्प केला.
या विद्यालयात इ.10वी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्या साठी श्री.छबु दशरथ मेचकूल यांनी पत्नी कै.अलका बाई छबु मेचकूल यांच्या स्मरणार्थ ५१००रु.ठेव ठेवली तर श्री.संतोष नंदन ठाकरे यांनी आई कै.सुशीला नंदन ठाकरे यांच्या स्मरणार्थ इ.10 वी प्रथम उत्तीर्ण मुलींसाठी ५१०० रु.ठेव ठेवली.
आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सेवक संचालक श्री.निंबाळकर सर,केंद्रप्रमुख श्री.उबाळे सर,पोलीस श्री.बच्छाव दादा,माध्य.स्कूल कमेटी अध्यक्ष अँड दौलतराव ठाकरे,उच्च माध्य.अध्यक्ष श्री बाबुराव सोनवणे तसेच सर्वच सदस्य,व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनीलजी ठाकरे व सर्व सदस्य ,वि.का.सोसायटी चेअरमन अँड भरतजी ठाकरे,आजी-माजीसंचालक ,सदस्य, सचिव, ग्रामसेवक, सरपंच सौ.कल्पनाताई ठाकरे,उपसरपंच सुशीलाताई सोनवणे,पोलिस पाटील श्री.दिपक ठाकरे, पत्रकार बंधू , प्राथमिक शाळा ,अंगणवाडी सेविका व मदतनीस विद्यालयातील सर्व समिती प्रमुख व सदस्य आणि सर्वच क्षेत्रातील देशप्रेमी व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर,पर्यवेक्षक श्री.शिर्के सर सर्व शिक्षक-शिक्षिका ,शिक्षकेतर बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.
सुंदर असे फलकलेखन श्री.प्रवीण ठाकरे कलाशिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कुंभार्डे सर तर आभार श्री कोल्हे सर यांनी मांडले .विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Post a Comment
0 Comments