चांदवडः आज दि. १६ ऑगस्ट कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचा वाढदिवस यानिमित्त डॉक्टर राहुल आहेर युवा मंच चांदवड तर्फे चांदवड शहरातील सर्वात जुनी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा ( दगडी शाळा ) येथील विद्यार्थ्यांना मंचचे युवा कार्यकर्ते युवराज आहेर मुकेश आहेर तुषार वाघ यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टी-शर्ट वाटप करण्यात आले.
आमदार डॉक्टर राहुल आहेर आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याने मंचच्या कार्यकर्त्यांनी एक विधायक कार्य म्हणून विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावे या हेतूने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर सुरेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मोहन काका शर्मा , अशोक काका व्यवहारे , बाळासाहेब वाघ , सुरेश जाधव , सोनू आप्पा पवार , पप्पू शेठ भालेराव , किशोर क्षत्रिय , बाळा पाडवी , राजाभाऊ आहेर , प्रसाद सोनवणे , विनायक सोमवंशी , तनवीर पठाण , कासिफ खान , सागर आहेर , संयम आचलिया , तसेच शाळेचे मुख्याध्यापक संदीप महाले सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होता.
Post a Comment
0 Comments