Type Here to Get Search Results !

चांदवड तालुक्यातील न्हनावे येथे मोफत होमीओपॅथिक आरोग्य निदान व उपचार शिबीर संपन्न.....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः एसएनजेबी चांदवड संचलीत श्रीमती के बी आबड होमीओपॅथिक मेडीकल कॉलेज व श्रीमान आर पी चोरडिया हॉस्पिटल च्या वतीने न्हनावे येथे मोफत होमीओपॅथिक आरोग्य निदान व उपचार शिबीर संपन्न झाले. या प्रसंगी सरपंच श्री कैलास गुंजाळ, उपसरपच विठ्ठल ठाकरे,बारकु आण्णा मोगल, देवराम जाधव, गंगाधर गुंजाळ, संपत ठाकरे, रूपाली मोगल,सौ. सुनिता दवंडे सौ सुनिता गुंजाळ, सौ.अलका मोगल आदी उपस्थित होते. सदर शिबीरात हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ प्रकाश कबाडे यांनी ५४ रुग्णांची तपासणी करून उपचार केले.
शिबीरास संस्थेचे चेअरमन श्रीमान बेबीलाल संचेती, श्रीमान अजितकुमार सुराणा, समन्वयक श्रीनंदकुमार ब्रम्हेचा, डॉ सुनिलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा, डॉ आकाश जैन, श्री पंकज चोपड़ा यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिक्षक डॉ अजय दहाड, डॉ सुनिल जांगडा, आंतरवासीय विद्यार्थी, साहेबराव गांगुर्डे, नर्स प्राजक्ता कुऱ्हाडे, संकेत मोगल यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments