चांदवडः श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक - १० जुलै २०२५ रोजी ' गुरुपौर्णिमोत्सव सोहळा ' साजरा करण्यात येत आहे.
महामुनी भगवान श्री कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने , महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबादप्रमाणे श्री गुरुपौर्णिमोत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने साजरा होत आहे.
तरी भाविकांनी सात्विक भावाने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा :-
सकाळी - ०४ वा. चंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक
सकाळी - ०५ वा. श्री चंद्रेश्वर बाबा समाधी पूजन
सकाळी - ०६ ते १० वाजेपर्यंत गुरुपूजन
सकाळी - १० वा. प्रवचन
सकाळी - १० ते १२ वाजेपर्यंत गुरुमंत्र दीक्षा
दुपारी - १२ वाजता भंडारा / महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला आहे.
Post a Comment
0 Comments