चांदवडः लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त व आषाढी एकादशी निमित्त होळकरवाडा (रंगमहाल) येथे रविवार( दि. 6 जून) रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संताजी महिला मंडळ चांदवडच्या महिला सदस्यांच्या हस्ते महाआरती करण्याचा मान देण्यात आला.
यावेळी सौ.कल्पना व श्री गणेश वाघ, सौ पुष्पा व श्री राजेंद्र बिरार, सौ अनिता व श्री सचिन (गुड्डू) खैरनार, सौ सोनाली व श्री किशोर बोरसे, सौ.उर्मिला व श्री महेश व्यवहारे, सौ रुपाली व श्री गोरख सूर्यवंशी,सौ साक्षी व श्री भूषण शिरसाठ, सौ प्रतिभा व श्री अनिल राऊत, या उपस्थित दापंत्यांच्या हस्ते मातोश्रीच्या मूर्तिचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे प्रमुख प्राचार्य दत्तात्रय बारगळ यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत डॉ. वर्षा चौरे लिखित " पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर " या चरित्र ग्रंथांचे उपस्थित सर्व महिला सदस्यांना वाटप करण्यात आले. प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर माहिती सांगितली.
सदरच्या कार्यक्रमास जेष्ठ नेते श्री अशोक काका व्यवहारे, श्री गणेश (गोटूशेठ) वाघ, श्री सचिन (गुड्डू) खैरनार, श्री किशोर बोरसे, श्री महेश व्यवहारे, श्री गोरख सूर्यवंशी, श्री भूषण शिरसाठ, उत्सव समितीचे श्री अनिल राऊत, श्री बाळा पाडवी, पुरोहित श्री अमोलजी दीक्षित आदींसह संताजी महिला मंडळाच्या सौ अनिताताई खैरनार, सौ बेबीताई साळुंखे, सौ कल्पनाताई वाघ,सौ पुष्पाताई बिरार, सौ आशा राऊत, सौ माधुरी लुटे,श्रीमती मीनाताई वाघ, श्रीमती सिंधुबाई व्यवहारे, सौ सोनाली बोरसे, सौ उर्मिला व्यवहारे,सौ ज्योती सोनवणे, सौ संगीता सोनवणे, सौ लिनाताई कर्डिले, सौ स्नेहलता बिरार, सौ प्रतिभा राऊत,सौ साक्षी शिरसाट, अँड.सौ सुवर्णा व्यवहारे, सौ रुपाली सूर्यवंशी, सौ वैशाली व्यवहारे, सौ पूजा सूर्यवंशी, सौ निशा व्यवहारे, सौ कल्पना लुटे, सौ अर्चना राऊत,सौ शीतल सोनवणे, सौ छायाताई शेजवळ, सौ कल्पना आहेर, श्रीमती जिजाबाई खैरनार, श्रीमती लताबाई लुटे, सौ दिव्या लुटे, सौ रंजना खैरनार, सौ वैशाली व्यवहारे, सौ मीराबाई शिरसाठ,सौ सुवर्णा वाघ,सौ जयश्री शिरसाठ, सौ रुपाली लुटे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Post a Comment
0 Comments