Type Here to Get Search Results !

विठ्ठल भक्ती ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उमेद देणारी शक्ती आहे.- गणेश निंबाळकर

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड प्रतिनिधी: -येथील मंगरूळ टोल प्लाझा NH3 येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे पूजन करून फराळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. व लेन मधील येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना एकादशी निमित्त केळी वाटप करण्यात आले.
        विठ्ठल भक्ती ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना उमेद देणारी शक्ती आहे. आषाढ सुरू झाला की शेतकऱ्यांच्या कामाला गती येते. विठ्ठल नामाचा गजरात श्रमाला विश्रांती मिळते. शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी व शेतीमालाला भाव मिळण्यासाठी पंढरपूरचा पांडुरंग कृपेची वृष्टी करेल. अशी भावना यावेळी गणेश निंबाळकर यांनी व्यक्त केली.
       या प्रसंगी प्रहार संघटनेचे युवा अध्यक्ष चंद्रकांत जाधव,समाधान भोईटे ,प्रहार टोल अध्यक्ष बन्सीलाल कासव, टोल प्रशासन अधिकारी मनोज पवार,रवि अहिरे आणि  कर्मचारी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments