चांदवडः आज दिनांक ०५/०७/२०२५ रोजी या ज्ञान संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिंडी सोहळ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी बनून आलेले होते. दिंडी सोहळ्यासाठी म.वि.प्र. चांदवड तालुका संचालक मा.डॉ. सयाजीराव गायकवाड साहेब, शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र पंडितराव ठाकरे तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.अशोककाका व्यवहारे व पालकवर्ग उपस्थित होता. सर्व प्रथम विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व समजून सांगण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. या नंतर पालखीचे प्रस्थान शाळेतून रंगमहाल, शिंपी गल्ली, वरचे गाव, बागवान पुरा, एकनाथ महाराज मंदिर, महादेव मंदिर या मार्गे झाले. रस्त्याने *ज्ञानोबा माउली तुकाराम* असा जयघोष करत करत पालखी मार्गस्त होत होती. रस्त्याने अनेक माय-माउलींनी पालखी चे पूजन केले. महादेव मंदिराजवळ श्री. व सौ. धोंडगे परिवाराच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. महादेव मंदिरात अतिशय सुंदर रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी केला. आनंदाने विठ्ठलाच्या नामात मग्न होऊन फुगड्या खेळल्या. अतिशय उत्साहात पालखी सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. जमधडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सोहळ्यासाठी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.रकिबे महेश, श्रीम. शिर्के संगीता, श्री. योगेश ठाकरे, श्री.ठाकरे मनोज, श्री.साईनाथ शिंदे, श्रींम. गवळी मनीषा, श्री. ठाकरे कल्याण, श्रीम. आहेर माधुरी, श्रींम. पवार परिघा, श्रींम. दिवटे मनीषा, सौ. ठाकरे पूनम , श्रीम. सवंद्रे उज्वला, श्री. शिंदे गौरव (संगीत शिक्षक), श्री.विवेक सोनावणे, श्रीं. गायकवाड जयश्री या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments