Type Here to Get Search Results !

चांदवडच्या कपूर ओडिसीयस इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी

सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
 चांदवड : येथील कपूर ओडीसीएस शाळेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे चेअरमन अतुल कपुर व शाळेच्या प्राचार्य रवींदर कपूर हे उपस्थित होते. आज शाळेमध्ये जणू काही पंढरपूर अवतरले होते यात मुलांनी विठ्ठलाची,तर मुलींने रुक्मिणीच्या पारंपारिक वेशभूषा सादर केलेली होती. मुलांकडून विठ्ठलाचे गाणे अभंग सादर करून घेतली. विद्यार्थ्यांची पायी दिंडी काढली जाऊन विठ्ठल नामाचा गजर करत सहभागी झाले सोबतच पर्यावरण संरक्षणाबद्दल जागृती देखील केली .मुलांना आषाढी एकादशीच्या अर्थ विठ्ठलाचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती नवले मॅडम यांनी दिली. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक असून सोन- प्रीत कौर, रूपाली नवले, जयश्री मोरे, सुनीता गीते, पूजा बर्डे, मनीषा आहेर ,पुष्पा पंडित, आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments