चांदवडः मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉ.ना .का. गायकवाड विद्यालय उसवाड येथे आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . यानिमित्ताने पालखीचे
पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत मोरे व शालेय समितीचे अध्यक्ष केदु काका बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ सभासद अशोक दादा गायकवाड उपस्थित होते.समवेत शालेय समितीचे सदस्य देवाजी गायकवाड,ज्ञानेश्वर शिंदे ,रावसाहेब गायकवाड,रुपेश मेतकर,बाबाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.यानंतर रघुनाथ सूर्यवंशी यांनी सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची श्रद्धा ,परंपरा याविषयी माहिती दिली. याप्रसंगी शालेय गीतममंचाने अभंग सादरीकरण केले व विठ्ठल जयघोषाने व टाळ मृदुंगाच्या गजरात व लेझीम पथकाच्या तालात विद्यालयातील चिमुकल्या वारकऱ्यांची पायी दिंडी काढण्यात आली .या दिंडी सोहळ्याचे आकर्षण म्हणजे चिमुकल्यानी केलेली विठ्ठल रखुमाई ची वेशभूषा ,वारकरी ,टाळकरी व विठू नामाचा गजर .तसेच या दिंडी सोहळ्यात रिंगण सोहळा देखील घेण्यात आला.यात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समिती ने केले.प्रसंगी विद्यालयातील कलाशिक्षक श्री. संजय गांगुर्डे यांनी साकारलेले रेखाचित्र हेही आजच्या सोहळ्याचे आकर्षण ठरले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक समितीचे प्रमुख रघुनाथ सूर्यवंशी यांनी केले .
Post a Comment
0 Comments