Type Here to Get Search Results !

चांदवड येथे श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयात "गुरुपौर्णिमा " उत्साहात

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः मराठा विद्या प्रसारक समाज संचलित श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .याप्रसंगी  विद्यालयाचे प्राचार्य श्री लोहकरे एस एन, पर्यवेक्षक महाले बी आर, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री लोखंडे सर, सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित होते.                
       कार्यक्रमाची सुरुवात व्यास ऋषींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.आरुषी मोरे तर सूत्रसंचालन जोहा इफत या विद्यार्थिनींनी केले. यानंतर सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. सार्थक पानसरे, चैताली, मृगनई सेलोकर ,वैष्णवी, वृषभ चव्हाण यांनी गुरु व शिष्य यांचे महत्त्व त्यांच्या भाषणातून व्यक्त केले.  
   विद्यालयाचे पर्यवेक्षक महाले सर यांनी महाभारत ,रामायण यातील गुरु शिष्यांचे नाते व महत्व विशद केले. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून श्री लोखंडे सर यांनी गुरु शिष्य परंपरा , धर्मग्रंथ ही भारतीय प्राचीन संस्कृती आहे ती जपली पाहिजे .यासाठी विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरांचे जतन व

Post a Comment

0 Comments