चांदवड : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार चांदवड या शाखेत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र ठाकरे, समिती उपाध्यक्ष अशोक काका व्यवहारे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी द्रोणाचार्य- अर्जुन, शिवाजी महाराज-जिजामाता, श्रीकृष्ण - अर्जुन, आई-मुलगा, शिक्षक-विद्यार्थी अशा अनेक गुरु-शिष्येच्या जोड्यांची वेशभूषा केली होती. आई ही आपली प्रथम गुरु असल्याने आईला सर्वप्रथम वंदन करावे. आपल्याला लाभलेल्या सर्वच गुरूंचा नेहमी आदर ठेवावा. असे मा. मुख्याध्यापक श्री जमधडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. शालेय गीत मंचाने गुरुने दिला ज्ञानरूपी वसा प्रार्थना सादर केली. उपशिक्षिका श्रीमती पूनम ठाकरे यांनी गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली. सर्व मान्यवर व शिक्षकांचा शालेय परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
गुरुपौर्णिमेनिमित्त चांदवड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बोडके साहेब, मा.विस्ताराधिकारी (शिक्षण) खैरनार साहेब, जि. प. चांदवड शाळेचे मुख्याध्यापक व चांदवड केंद्राचे केंद्रप्रमुख महाले सर यांचा मुख्याध्यापक जमधडे सर यांनी सत्कार केला व गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी गुंजाळ विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे सर, जि. प.शाळा निमगव्हाण चे मुख्याध्यापक शांताराम हांडगे सर , नेमिनाथ जैन माध्य. विद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर, नेमिनाथ जैन प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक ललवाणी सर, , उर्दु शाळेचे मुख्याध्यापक खान सर यांनाही शाळेत आमंत्रित करून त्यांना संविधानाची प्रत, दिनदर्शिका व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले व सर्वांना गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
अशा रीतीने अतिशय उत्साहामध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला
Post a Comment
0 Comments