चांदवड : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉ. ना.का.गायकवाड विद्यालय उसवाड येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महान ऋषी ,वेदांची निर्मिती करणारे महर्षी व्यास यांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक निरंजन बिडगर,समाधान पवार, रघुनाथ सूर्यवंशी ,सुखदेव दुकळे,संजय गांगुर्डे, राहुल देवरे उपस्थित होते . त्यानंतर शालेय गीतमंचानी गीतगायनातून गुरू महिमा मांडला.याप्रसंगी सर्व गुरुजनांचा पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील कल्याणी निकम,क्रांती पवार, ईश्वरी पवार,ज्ञानेश्वरी पवार,मृण्मयी कासव,यश गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले.
त्यानंतर शिक्षक मनोगतातून जेष्ठ शिक्षक रघुनाथ सूर्यवंशी यांनी गुरुचे जीवनातील महत्व ,गुरुची मार्गदर्शक म्हणून भूमिका याबाबत माहिती दिली.त्यानंतर अध्यक्षीय मनोगतात मा. मुख्याध्यापक मोरे सर यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्व असते व गुरू वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हे सांगितले. त्यात त्यांनी विविध अभंग ,ओव्या यांतून गुरुमहिमा सांगितला.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीने केले व सादरीकरण इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थ्यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील कलाशिक्षक संजय गांगुर्डे यांनी फलकलेखन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पवार या विद्यार्थ्यांने केले व आभार प्रदर्शन उपशिक्षिका मनीषा गायकवाड यांनी केले .कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments