चांदवडः महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे यांनी जि.प. प्राथमिक शाळा सोग्रस येथे 10.50 वा.आकस्मिक भेट दिली.
शाळेत सुरू असलेला आदर्श परिपाठ बघितला त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधुन विद्यार्थ्याशी चर्चा केली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य गीत' म्हणून दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी राज्य गीताचे गायन केल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले
यावेळी सोग्रस ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव गांगुर्डे यांनी ग्रामस्थ, शिक्षक वृंद व शालेय कमिटी सदस्यांसह शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे स्वागत केले.संपूर्ण शाळेची पाहणी केल्यानंतर दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले व गावातील शाळेला ज्या अजूनही त्रुटी आहेत त्या संपूर्णपणे निवारण करण्याचे आश्वासन यावेळी दिले व सरपंच ग्रामस्थ व शिक्षक तसेच विद्यार्थी वर्ग यांचे अभिनंदन केले
Post a Comment
0 Comments