Type Here to Get Search Results !

भूषण कासलीवाल यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५५ हजारांचे योगदानमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : सामाजिक आणि जबाबदारीचे भान जपत चांदवड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस “ ५५ हजार रुपयांचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, इतर खर्चाला फाटा देत हे योगदान देण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘साजरा करा वाढदिवस, पण समाजासाठी’ या भावनेतून सहायता निधीत देणगीचे आवाहन करण्यात आले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देताना कासलीवाल यांनी वाढदिवसाच्या वर्षांप्रमाणे ५५ हजार रुपयांचे योगदान देत इतर जनप्रतिनिधींनाही एक सामाजिक संदेश दिला आहे. या निधीचा धनादेश चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात प्रांताधिकारी कैलास कडलग व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे सादर करण्यात आला.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे केवळ राजकीय नव्हे, तर लोकसेवेच्या उंचीवर नेणारं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा निधी समर्पित करणे, ही माझ्या कडून एक लहानशी कृतज्ञता आहे,” अशी भावना यावेळी भूषण कासलीवाल यांनी व्यक्त केली. यावेळी  चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा ता. अध्यक्ष मनोज शिंदे, मोहन शर्मा, सुनील डूंगरवाल, गणपत ठाकरे, देविदास आहेर, राजू पाटील, गीता ताई झाल्टे, विशाल ललवाणी, नितीन गांगुर्डे, गणेश ठाकरे , वाल्मीक पवार, पिंटू भोईटे, विठ्ठल आवारे, श्रावण जाधव, अमोल जाधव, मुन्ना गांधी,गोकुळ देवरे , सुभाष पुरकर आदी. पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
चांदवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीचा चेक प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे प्रदान करतांना भूषण कासलीवाल, आमदार डॉ. राहूल आहेर व उपस्थित भाजपा पदाधिकारी.

Post a Comment

0 Comments