चांदवडः कपूर ओडिसियस इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिनापासून "एक पेड मां के नाम"ही संकल्पना राबवण्यात आली यावेळी शाळेचे चेअरमन अतुल कपूर व शाळेच्या प्राचार्य रविंदर कपूर हे उपस्थित होते.आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे आयुष्यात आईला सर्वोच्च स्थान हे लक्षात घेऊन शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष म्हणून राबवण्यात आले. वृक्षारोपण व पर्यावरणाचे संबंधित माहिती नवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. शाळेचे सर्व शिक्षक सोनप्रीत कौर, रूपाली नवले ,जयश्री मोरे, सुनीता गीते ,पूजा बर्डे ,मनीषा आहेर , गुनिता भोई ,आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments