धुळेः , महाराष्ट्र शासनामार्फत हा दिवस हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.
कृषी महाविद्यालय, धूळे येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी यांनी निमडाळे येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
त्यांनी कृषी तंत्रज्ञानाची माहितीच्या प्रसारार्थ गावातील शेतकरी प्रसारक संघटनेच्या जयहिंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनसमवेत गावात प्रभात फेरीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी ' जय जवान, जय किसान' च्या घोषणांनी सर्वांनी कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले ग्रामसेवक सु. भा. देसले, संघटनेचे चेअरमन नानासाहेब, विद्यालयाचे मुख्यध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी 'मृदा पूजन' करुन धरनी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामसेवक सु.भा. देसले यांनी कृषी दिनानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कृषी दिनाची आठवण म्हणून आणि वसंतराव नाईक यांच्या कार्याच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचा शेवट वृक्षारोपण करून करण्यात आला.
Post a Comment
0 Comments