Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे 2 विद्यार्थी तालुक्यात प्रथम.....महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत नेमिनाथ जैन विद्यालयाचे घवघवीत यश....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
श्री नेमिनाथ जैन विद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कपिश पवनकुमार अग्रवाल आणि सक्षम साहेबराव बच्छाव हे 2 विद्यार्थी चांदवड तालुक्यात प्रथम आले आहेत. तर वेदांत दिगंबर देवढे, तनिष्क उत्तम पिंपरे हे विद्यार्थी उत्तेजनार्थ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  सार्थक रविंद्र ठाकरे या विद्यार्थ्यास विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी विद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, परीक्षा तालुका समन्वयक गंगाधर खैरनार आणि उपशिक्षिका वैशाली भामरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments