Type Here to Get Search Results !

नांदगाव मध्ये विकास कामांचे भूमिपूजन संपन्न सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते नांदगाव शहरात विविध रस्ता कॉंक्रिटीकरण व भुयारी गटात कामाचे भूमिपूजन संपन्न.

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
नांदगाव : शहरातील नगरपरिषद हद्दीत लक्ष्मी ज्वेलर्सचे श्री मेडिकल पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व भुयारी पाईप गटार तसेच सोन्या मारुती चौक ते गांधी चौक पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण व भुयारी पाईप गटार करणे या कामांचे भूमिपूजन सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
    आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात विविध रस्ता काँक्रिटीकरण व भुयारी गटार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून या माध्यमातून नागरिकांना उत्तम रास्ते व भुयारी गटार मुळे स्वच्छ रस्ते मच्छर मुक्त वातावरण निर्माण होत आहे. 
     याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे आनंद कासलीवाल नंदू पाटील सुरेश कासार मुकुंद खरोटे नरेंद्र खरोटे प्रमोद बाविस्कर राजेंद्र कासार अमोल शेठ नावंदर यज्ञेश कलंत्री सागर हिरे गुलाब भाबड, प्रकाश शिंदे  मुजू शेख सिद्धेश खरोटे जय खरोटे लालू दर्डा अय्याज शेख मनीष बाविस्कर सुमित कांदे शिवसेना महिला आघाडीच्या उज्वलाताई खाडे नांदगाव शहर प्रमुख रोहिणीताई मोरे, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments