Type Here to Get Search Results !

अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार चांदवड येथे पालक मेळावा व राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार चांदवड या शाखेत पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. 
       पालक मेळाव्यासाठी तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी मराठा विद्या प्रसारक समाज चांदवड तालुका संचालक मा.श्री. गायकवाड साहेब यांनी शुभेच्छा दिल्या..
        पालक मेळाव्यासाठी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी  ठाकरे साहेब, उपाध्यक्ष मा. श्री अशोक काका व्यवहारे, मुख्याध्यापक मा. श्री जमधडे कैलास निवृत्ती तसेच सर्व पालक व शिक्षक उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक शाखेचे माननीय मुख्याध्यापक श्री जमधडे कैलास निवृत्ती यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करावे असे आवाहन केले.                 
या सभेत शाळा स्तरावरील विविध समित्या एकत्रिकरण करणे, समिती सदस्यांचे पुनर्गठन करणे, शालेय अभ्यासक्रम नियोजन, विद्यार्थी सुरक्षा, महिला तक्रार निवारण, भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार याबाबत नवीन शासन निर्णयानुसार काय- बदल झाले याबाबत सविस्तर माहिती शाळेतील उपशिक्षक श्री. रकिबे महेश पुंडलिकराव यांनी समजाऊन सांगितली सर्व समित्यांवर नवीन सदस्यांची नेमणूक सर्वानुमते करण्यात आली. 
      नवनिर्वाचित पालक सदस्यांचे अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी  ठाकरे साहेब यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन  अभिनंदन केले. यावेळी सौ कोमल सूर्यवंशी, श्री दत्तू भाऊ गांगुर्डे या पालक प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र ठाकरे यांनी सर्व पालक व विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी शुभेच्छा दिल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिर्के एस. एस. यांनी केले. श्री रकीबे एम.पी.यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपशिक्षक श्री. ठाकरे वाय. टी., श्रीमती गवळी एम. एन., श्रीम. आहेर, श्रीम. पवार, श्रीम. दिवटे,  श्रीम. ठाकरे श्रीम. सवंद्रे , श्री. ठाकरे के. एस., श्री शिंदे सर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments