धुळेः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धुळे तालुक्यातील निमडाळे गावात दाखल झाल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषी कन्या देणार आहेत. निमडाळे (ता. धुळे) येथे कृषिकन्यांचे स्वागत, गावचे सरपंच सुधाकर नाना सैंदाणे व ग्रामस्थांनी केले.
कृषिकन्या प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन प्रथम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या, शेतकऱ्यांचे जीवनमान आणि गावातील सामाजिक, आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, पिकांवरील विविध कीड व रोगांचे व्यवस्थापन, हवामान सल्ला बाजारभाव व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कृषिकन्या पायल कारखिले, रोशनी दळवी, अनुजा पाटील, चारुशीला मेहेत्रे, अर्चना निमसे, ज्ञानेश्वरी लांबे या शेतकऱ्यांना देणार आहेत. कार्यक्रम अधिकारी डॉ सोनाली गदमले व केंद्रप्रमुख के.के. बऱ्हाटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी सुधाकर नाना सैंदाणे ( सरपंच), चुडामण पाटील( उपसरपंच ), सु. भा. देसले ( ग्रामविकास अधिकारी) भटु तुळशीराम पाटील, राजेंद्र श्रावण सूर्यवंशी, विजय देविदास पाटील, योगेश वाल्मीक पाटील उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments