चांदवडः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त ( रंगमहाल ) होळकरवाडा येथे दर रविवारी महाआरतीचे आयोजन करण्यात येते यावेळी ' नवदुर्गा महिला मंडळ , शिंपी गल्ली चांदवड च्या महिला सदस्यांना आज महाआरतीचा मान देण्यात आला.
यावेळी प्राचार्य दत्तात्रय बारगळ यांच्या संकल्पनेतून " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित ३००० चरित्र ग्रंथांचे वाटप " वर्षभर सुरू राहणार आहे. उपस्थित महिला मंडळाच्या सदस्यांना प्रसिद्ध चित्रकार देव हिरे , ग्रंथपाल नितीन शिंदे , गणेश खैरनार , बाळा पाडवी , उद्धव शेवाळे , यांच्या हस्ते चरित्र ग्रंथांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार देव हिरे सरांना ' पद्मपाणी , राष्ट्रीय राज्य पुरस्कार ' मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
नवदुर्गा महिला मंडळ , शिंपी गल्ली चांदवड येथील महिला सदस्य यांनी सहभाग नोंदविला. वैशाली चव्हाण , नयना वाघ , सारिका देशमुख , आशा गायकवाड , अश्विनी पारवे , भाग्यश्री पारवे , चित्रा गवळी , दिव्या लुटे , ज्योती चव्हाण , काजल देशमुख , मोना कापडणे , पूजा देशमुख , प्रिया शिंदे , पूजा ठाकूर , पुनम व्यवहारे , पुष्पा निकम , राधिका सोळसे , राणी कोळेकर , रोहिणी साळुंखे , रूपाली लुटे , सोनाली शिंदे , सोनी उगले , सुमन निकम , सुशीला जांगिड , सुवर्णा देशमुख , अरुणा कोकंदे , भारती चव्हाण , कल्पना आहेर , लता लुटे , रोहिणी व्यवहारे , संगीता साबळे , सुरेखा खैरनार , वैष्णवी साळवे , सीमा पैंजणे , आदी महिला उपस्थित होत्या.
दर रविवारी विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन केले जाईल व उपस्थितांना मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र ग्रंथांचे वाटप केले जाईल. तरी दर रविवारी महाआरतीस उपस्थित राहण्याचे आवाहन 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जन्मोत्सव समितीचे सदस्य प्राचार्य दत्तात्रय बारगळ , प्रा. डॉ. सुरेश पाटील , दत्तात्रय आबा गांगुर्डे , कैलास गुंजाळ , रूपेश पवार , डॉ. मनोज पगारे , डॉ. तुषार चिंचोले , अमोल दीक्षित , आर्चित दीक्षित , गुड्डू खैरनार , संजय पाडवी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments