Type Here to Get Search Results !

चांदवडच्या जनता विद्यालयातील १९९४-१९९५ च्या बॅचचे (स्नेह मेळावा )गेट टुगेदर संपन्न

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः "आवडते मज मनापासून शाळा! लावीती लळा जशी माऊली  बाळा! " ....... या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आपली शाळा,गुरुजन,मित्र याविषयीच्या आठवणी त्यांनी साठवून ठेवलेल्या असतात या आठवणीतूनच १९९४-१९९५ या वर्षातील जनता विद्यालय चांदवड येथील शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी एकत्र येत शाळेमध्ये आपल्या गुरुजनांसमवेत मेळाव्याचे आयोजन केले होते.

याचवेळी व्यासपीठावर ज्ञानार्जन करणारे गुरुवर्य उपस्थित होते यात गुलाबराव कापडणी सर,एल.डी.आहेर सर, आर. एम.पवार सर, एन.पी.गांगुर्डे सर व रत्नमाला सोनवणे मॅडम व काजीसांगवी हायस्कुलचे नवनियुक्त मुख्याध्यापक जिभाऊ शिंदे हे शिक्षक वृंद उपस्थित होते. 
यावेळी मुख्याध्यापक म्हणुन नेमणुक झाल्याने जिभाऊ शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.
या मेळाव्याच्या आयोजनात विष्णु थोरे, पांडुरंग भडांगे व रुपाली पाटील,आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडु भडांगे व कवी प्रा.विष्णु थोरे यांनी केले.
सदरच्या स्नेह मेळाव्यासाठी १९९४ - ९५ च्या बॅचचे वनिता सोमवंशी,नंदा गांगुर्डे,अलका शिंदे, सुवर्णा काळे,सुनिता पवार,रुपाली पाटिल, दुर्गा राय,मनिषा ठोंबरे,निलीमा कस्तुरे,सारीका लोखंडे,दिपाली जाधव,विष्णु थोरे,सुकदेव गायकवाड,पांडुरंग भडांगे, नंदू शिंदे,बळीराम कोदे ,गोकुळ खैरे,देवीदास बनकर,नामदेव चौघुले भाऊसाहेब जाधव, संदिप गांगुर्डे हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments