चांदवड आज रोजी जिल्हा परिषद शाळा वराडी येथे शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला नवगतांची गावातून उंटावरून प्रभात फेरी काढण्यात आली त्याचप्रमाणे नवगतांचे पुष्पवृष्टी करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांचे औक्षण करून पहिले पाऊल घेण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश बूट सॉक्स यांचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना गोड आंबट वरण-भात व गोड शिरा वाटप करण्यात आलासदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य पालक ग्रामस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते निमोन केंद्राचे केंद्रप्रमुख भाऊसाहेब निकम ही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक अनिल शंकर यांनी केले व शेवटी मंगेश बोरसे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Post a Comment
0 Comments