Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जन्मोत्सव वर्ष २०२५ निमित्ताने... ' जागर होळकरशाहीचा' या उपक्रमांतर्गत महाआरतीचे आयोजन...


सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त ( रंगमहाल ) होळकरवाडा येथे दर रविवारी महाआरतीचे आयोजन करण्यात येते यावेळी ' रक्षिता नारी आधार महिला मंडळ चांदवड च्या सदस्यांना आज महाआरतीचा मान देण्यात आला. 
       यावेळी प्राचार्य दत्तात्रय बारगळ यांच्या संकल्पनेतून " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित ३००० चरित्र ग्रंथांचे वाटप " वर्षभर सुरू राहणार आहे. उपस्थित महिला मंडळाच्या सदस्यांना राष्ट्रपती पारितोषिक विजेते अशोक काका व्यवहारे व अध्यात्मिक मार्गदर्शक ह.भ.प. कदम माऊली उर्फ भास्कर महाराज कदम आणि प्रा. विनोद महाले यांच्या हस्ते चरित्र ग्रंथांचे वाटप करण्यात आले. 
        सौ. जयश्री सुनील कोकणे , सौ. पुनम मनोज बांगरे , ॲड. सौ. अभिलाषा दायमा , सौ. लिना विनोद महाले , सौ. भारती उद्धव शेळके , सौ. स्वीटी राहुल अग्रवाल , डॉ. सौ. सुनीता सचिन अग्रवाल , श्रीमती सुनीता काशीनाथ पवार , तेजश्री रोशन नेरकर आदी महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. 
      दर रविवारी विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन केले जाईल व उपस्थितांना मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र ग्रंथांचे वाटप केले जाईल. तरी दर रविवारी महाआरतीस उपस्थित राहण्याचे आवाहन 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जन्मोत्सव समितीचे सदस्य प्राचार्य दत्तात्रय बारगळ  , प्रा. डॉ. सुरेश पाटील , दत्तात्रय आबा गांगुर्डे , कैलास गुंजाळ , रूपेश पवार , डॉ. मनोज पगारे , डॉ. तुषार चिंचोले , अमोल दीक्षित , आर्चित दीक्षित , गुड्डू खैरनार , संजय पाडवी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments