Type Here to Get Search Results !

चांदवडच्या कपूर ओडिसीयस इंटरनॅशनल स्कूल मध्ये योगा डे साजरा.

सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड :- येथील कपूर ओडिसीयस इंटरनॅशनल स्कूल या शाळेत आज गुरुवार दिनांक २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे चेअरमन अतुल कपूर व शाळेच्या प्राचार्य रवींदर कपूर हे उपस्थित होते.
    योग हे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य साधणारे साधन आहे. यामुळे आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि जीवनात समतोल निर्माण होतो. असे प्राचार्य कपूर यांनी यावेळी सांगितले.
       शाळेत उत्साही वातावरणात योग दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमात १२० विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षिका व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
      शाळेतील उपशिक्षिका सोनप्रीत कौर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे महत्त्व आणि त्यांचे फायदे या बद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ताडासन , वृक्षासन , त्रिकोणासन , सूर्यनमस्कार आणि प्राणायाम यांचा सराव केला. 
          यावेळी शाळेच्या सर्व शिक्षिका रूपाली नवले ,  जयश्री मोरे , गुनिता भोये , सुनिता गीते , पूजा बर्डे , मनीषा अहिरे , पुष्पा पंडीत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments