Type Here to Get Search Results !

शेलू येथील शेततळ्यात 65 वर्षीय महिलेचा शेततळ्यातील पाण्यात पडून मृत्यु


सदगुरु रक्षान्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : तालुक्यातील शेलू येथील परसराम गोपाळा जाधव यांच्या पत्नी सुशीला परसराम जाधव (वय 65 वर्ष) ह्या त्यांच्या शेततळ्यात पाणी बघण्यासाठी गेल्या असता त्या शेततळ्यातील पाण्यात पडल्याने बेशुद्ध झाल्या त्यांना औषध उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी तपासणी करून  त्या मयत असल्याचा घोषित केले, याबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्यात दिपक शंकर जाधव  धंदा - शेती  शेलु यांनी झालेल्या घटनेच्या संदर्भात खबर दिली. ही खबर दिल्याने अकस्मात रजिस्टर मृत्यू दाखल करण्यात आला.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण वडनेरभैरव पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments