Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैनच्या एन. सी. सी. विद्यार्थ्यांचे सुवर्ण यश.... नासिक येथील एनसीसी कॅम्प घवघवीत यशाने संपन्न

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- विद्यालयातील एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थांनी प्रशिक्षण शिबीरात घवघवीत यश संपादित केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
 ५ मे ते १४ मे २०२५ या कालावधीत मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे संपन्न  झालेल्या एन सी सी च्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्या एन सी सी च्या १८ मुली व २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणात विद्यार्थी सक्षम आणि सुजाण नागरिक घडावा या उद्देशाने ड्रिल, मॅप रीडिंग, शस्त्र प्रशिक्षण, वाहतुकीचे नियम, आपात कालीन परिस्थितीत एन सी सी च्या विद्यार्थ्यांची भूमिका, अग्निशामक प्रशिक्षण इ.  प्रकारचे सैनिकी शिक्षण देण्यात आले. यात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत वैष्णवी पवार व निबंध स्पर्धेत खुशी गांगुर्डे यांना गोल्ड मेडल, आणि मुलींच्या खो खो स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकाविली.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे एन सी सी विभाग प्रमुख राजेश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या कामगिरीबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्यासह विद्यालयातील सर्व घटकांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments