नासिकः परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामधील सातपूर, अंबड,सिन्नर, गोंदे आणि दिंडोरी एमआयडीसी मधील काही आस्थापनांकडून सातत्याने पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसऊन प्रचंड प्रमाणात जल व वायू प्रदूषण होत आहे, याचे सातत्याने पुरावे, पत्र, निवेदने देऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही,
सदर आस्थापना मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस प्रदूषण करत आहेत, परिणामी नाशिक जिल्ह्यामधील लाखो नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेला असून निसर्गाचे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे म्हणून हे सर्व प्रश्न घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी श्री निंबाजी भड यांना भेटून सदर परिस्थितीचे गांभीर्य हे समजावून सांगितलं येत्या काही दिवसात जर या दोषी आस्थापनांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभा करू असा इशारा याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री आनंत नाना सांगळे यांनी दिला...
याप्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री आनंत नाना सांगळे, संघटक श्री अशोकजी तांबे, जिल्हामहासचिव माधव यशवंते, नाशिक शहरउपाध्यक्ष श्री मधुकर जी भोर, जिल्हासचिव श्री दिलीपराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष मनोज जगताप, नाशिक जिल्हा संघटक रावसाहेबजी गरुड, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाबाजी गांगुर्डे,नाशिक महिलाजिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे , जिल्हा कार्याध्यक्ष सौं.कविताताई पाटील नाशिक शहराध्यक्ष सुनंदाताई विसपुते, नांदगाव तालुका अध्यक्ष सचिनजी शिराळ,इगतपुरी तालुकाअध्यक्ष किसनजी गायकर, इगतपुरी तालुका उपाध्यक्ष सुखदेवजी बागुल, चांदवड तालुकाध्यक्ष अशोकजी कापडणे चांदवड तालुकाकार्याध्यक्ष भगवानजी गांगुर्डे, चांदवड तालुकाअध्यक्ष महिला उषाताई सोनवणे, दिंडोरी तालुकाअध्यक्ष श्री किशोरजी पिंगळे, मिराताई आवारे, सोनाली पिंगळे, पूजाताई ठाकरे, शालन सोनवणे,दिपाली शिलावट दत्तात्रय जाधव, सविता गोसावी,अश्विनीताई गांगुर्डे, संध्याताई गोसावी, नमन आडोळे, दिगंबर केदार,आदी कार्यकर्ते व समर्थक उपस्तिथ होते.
Post a Comment
0 Comments