Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र संघटक पदी ताराचंद आहिरे यांची निवड


सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब, यांचे मार्गदर्शनाने रिपाई-आठवले ह्या पक्षाच्या माध्यमातून ताराचंद एकनाथ आहिरे यांनी
 केलेल्या कामकाजाची व कार्याची योग्य दखल घेण्यात आली असुन ताराचद अहिरे यांची उत्तर महाराष्ट्र संघटक या पदावर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया चे (आठवले गट) नेते प्रकाश लोंढे यांनी निवड केली आहे.
यापुढे पक्षाने दिलेले काम व पक्षाचे संघटन प्रभावीपणे वाढवण्यासाठी व पक्षाची शिस्त ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी तसेच पक्षाने वेळोवेळी दिलेले निर्देश व आदेश याची काटेकोरपणे व निस्वार्थीपणे अंमलबजावणी करणेसाठी व पक्षाशी एकनिष्ठ व कटिबद्ध राहुन मी पक्षसेवा करेल अशी ग्वाहीच आपल्या संबोधनात नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र संघटक ताराचंद अहिरे यांनी दिली.
यावेळी पक्षाचे नेते प्रकाश लोंढे, वंदेशभाऊ गांगुर्डे (मनमाड ), जेष्ठनेते अनिल केदारे, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष हारूनभाई अत्तार, संजय बनकर यांचेसह चांदवड ,देवळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments