चांदवड : जम्मु कश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चांदवड शहरातील आठवडे बाजार गणुर चौफुली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून तीव्र स्वरूपाची घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवला व जोरदार घोषणाबाजी केली "भारत माता की जय" "निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है" "अरे ह्या पाकिस्तानच करायचं काय खाली डोकं वर पाय" "बुलंद आवाज कुणाचा शिवसेनेचा" "हिंदुरुदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो"अशा घोषणांनी आठवडे बाजार गणुर चौफुलीचा परिसर दणाणून गेला होता यानंतर चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलासजी वाघसाहेब यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले महोदय जम्मू कश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो अंदाधुंद गोळीबार केला जो भ्याड हल्ला केला त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा चांदवड शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर निषेध करतो व ह्या भ्याड हल्ल्यात निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ह्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला केंद्र सरकारने जशास तसे उत्तर देऊन बदला घ्यावा ही समस्त शिवसैनिकांची मागणी आहे पहलगाम,जम्मू-कश्मीर येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळिमा फासणारा व अत्यंत निंदनीय आहे.तो केवळ हिंसेचा प्रकार नाही,तर आपल्या भारत देशाच्या संयमाची आणि सुरक्षिततेची कसोटी देखील बघणारा आहे.या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणारा आहे.या अमानुष कृत्याचा आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र शब्दात निषेध करतो आणि या भ्याड हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महोदय आम्ही आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करतो की केंद्रसरकारने आता केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही,तर देशाच्या शांततेला आव्हान देणाऱ्यांना कठोर आणि ठोस प्रत्युत्तर देणे हीच खरी देशसेवा ठरेल.पुनश्य एकदा अतिशय भ्याडपणे करण्यात आलेल्या ह्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या चांदवड शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो सदरच्या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख श्री विलासनाना भवर शिवसेना शहर प्रमुख श्री प्रसादभाऊ प्रजापत शिवसेना शहर संघटक श्री सचिन (गुड्डू) खैरनार शिवसेना तालुका संघटक श्री केशव ठाकरे शिवसेना वडाळीभोई गटप्रमुख श्री अशोक भाऊ शिंदे शिवसेना उप तालुकाप्रमुख श्री सागर बर्वे शिवसेना उप शहरप्रमुख श्री शंभूराजे खैरे शिवसेना शहर समन्वयक श्री सुरेश सोनवणे उपशहर प्रमुख श्री तोफिक भाई शेख वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष श्री अकबरभाई पठाण शिवसेना उप शहरप्रमुख श्री मनोज जाधव जेष्ठ शिवसैनिक श्री विष्णूकाका कोतवाल श्री वसीमभाई शेख युवा सेनेचे श्री प्रमोद उशीर श्री नितिन निकम श्री सगर खान श्री याकुबभाई तांबोळी श्री सौरव देशमाने श्री अदनान घासी श्री सुफियांन पठाण श्री संदिप गांगुर्डे बाळासाहेब यठाडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments