चांदवडः श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालयातील उपशिक्षिका दिवटे मॅडम व भुत्याने शाळेवर कार्यरत शिक्षक श्री संतोष चव्हाण सर यांची सुकन्या श्रुतीने UPSC परीक्षेत उज्वल यश मिळविले .यानिमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य श्री लोहकरे एस एन, पर्यवेक्षक श्री महाले सर ,सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रुतीचा सत्कार केला.
कु. श्रुती संतोष चव्हाण हिने वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सी एस इ परीक्षेत ऑल इंडिया रँक 573 प्राप्त केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यासाठी तिने दहावीपासूनच परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तिच्या आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन लाभले. तसेच तिने ऑनलाइन अभ्यासाच्या माध्यमातून हे उज्वल यश मिळवले. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे
विद्यालयाचे प्राचार्य यांनीही तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गरुड सर यांनी केले मनोगत श्रीमती निकम एसटी व आभार श्री एन के ठाकरे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments