आरोग्यसेवक 50% निवड यादी जाहीर होत नसल्याने उमेदवारांचा उपोषणाचा इशारा.
April 23, 2025
0
नाशिक. : नाशिक जिल्हा परिषद आरोग्यसेवक 50% भरतीची जाहिरात 2023 या वर्षी आलेली होती.त्याची परीक्षा 2024 यावर्षी होऊन निकाल 28 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झालेला होता. काही कालावधीसाठी न्यायालयीन निकालानंतर तत्काळ नियुक्ती देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषद यांना 12 मार्च 2025 रोजी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेने 20 मार्च 2025 रोजी कागदपत्र पडताळणी केली. तब्बल 1 महिना उलटूनही तात्पुरती निवड यादीसुद्धा जाहीर केलेली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली असून उमेदवारांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केल्यावर 2 -3 दिवसात यादी लागेल असे पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.इतर जिल्हा परिषद जसे की जळगाव व आणखी काही जिल्हा परिषदेने नाशिक नंतर कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती सुद्धा दिलेली असल्याने उमेदवारांनी स्थानिक मंत्री,आमदार खासदार यांचेकडे गाऱ्हाणे मांडले याबाबत मंत्री दादा भुसे ,खासदार भगरे सर आदी लोकप्रतिंधीनी फोनद्वारे संपर्क करून तर काही लोकप्रनिधींनी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर नियुक्ती देण्यासाठी विनंती केली मात्र त्यातूनही मार्ग न निघाल्याने अखेर आज 23 एप्रिल 2025 रोजी उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषद आवारात दिनांक 30 एप्रिल 2025 पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आज दिले आहे.
Post a Comment
0 Comments