चांदवड : येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या जनसंपर्क कार्यायल, चांदवड येथे भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी चांदवड तालुक्यातील भाजपा जेष्ठ पदाधिका-यांच्या आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने पक्षाच्या जेष्ठ पदाधिकारी यांच्यासाठी निवडला आज मोठ्या प्रमाणामध्ये आज या देशांमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी सत्ता आहे आणि त्याच्यामुळे आपलं या पक्षाच्या जडणघडणीमध्ये जे काही योगदान आहे.
हा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा जो ज्येष्ठ कार्यकर्ता आहे हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहिलेला कार्यकर्ता आहे. आपल्याला अनुभव आला
आणि आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या भरोशावरच पुनश्च एकदा या देशांमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेले आहेत आज या भारतीय जनता पक्षाच्या स्थापनाच्या दिवशी आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानले.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजप जेष्ठ नेते श्री.अशोक काका भोसले, भाजप जेष्ठ नेते श्री.विलास ढोमसे, भाजप जेष्ठ नेते श्री.अशोक काका व्यवहारे, भाजप जेष्ठ नेते श्री.दौलतराव जाधव, श्री.माधवराव शिंदे, श्री.बाळासाहेब शेळके, श्री.सुभाष भवर, भाजप सरचिटणीस श्री.भूषण कासलिवाल, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.शांताराम भवर, श्री.संदीप काळे, श्री.गणपत ठाकरे तसेच चांदवड तालुक्यातील भाजपचे सर्व जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments