Type Here to Get Search Results !

बिटस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा संपन्न

सदगुरु रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवद )
 चांदवड : आज दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी वडाळीभोई बीटातील भोयेगाव, सोग्रस  व वडाळीभोई केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्पेलिंग बी स्पर्धा संपन्न झाल्या.
नाशिक जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल मॅडम यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्पेलिंग बी स्पर्धा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत शाळा , केंद्र,बीट, तालुका आणि जिल्हा स्तरापर्यंत विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या स्तरावर स्पेलिंग बी उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांतील ग्रामीण  विद्यार्थ्यांना त्यांच्या इंग्रजी विषयाबाबतचे भीती दूर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे तसेच इंग्रजी शब्द संग्रह वाढवण्यासाठी इंग्रजी भाषेची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या अंतर्गत वडाळीभोई बीटातील वडाळीभोई , भोयेगाव आणि सोग्रस केंद्रातून निवडण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांमधून बीट स्तरावर स्पेलिंग बी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये बीटा तून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी निवडून त्या विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर स्पेलिंग बी स्पर्धेत सहभागाची संधी देण्यात येणार आहे. 
बिटस्तरीय स्पर्धा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री रामचंद्र बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली  केंद्रप्रमुख सुनंदा जाधव, पगार सर त्याचप्रमाणे मुख्याध्यापक श्रीमती संगीता जाधव, श्रीमती ज्योती जाधव ,श्री बाळासाहेब धाकराव, तसेच सोमनाथ पवार,मेघा कुंभारकर, केशव वाकचौरे , रवी जाधव , आणि बीटातल प्रत्येक शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 
1. गट इयत्ता 1 ली व 2 री
प्रथम : वैष्णव विठ्ठल ठाकरे , वडाळीभोई मुले
द्वितीय : कौस्तुभ निलेश सोमवंशी भाटगाव
तृतीय : दिगंबर देवराम केकान , पानसरे वस्ती

2. गट इयत्ता 3 री व 4 थी 
प्रथम : गुणज्ञा गोरख ढवळे , भोयेगाव
द्वितीय : स्वरा योगेश शिंदे , शिंदे
तृतीय : युगश्री जुलियस अभ्यंकर सोग्रस

3. गट इयत्ता 5 वी व 6 वी 
प्रथम : सार्थक परशुराम शिंदे, शिंदे
द्वितीय : राम रमेश पालीवाल , सोग्रस
तृतीय : श्रावणी नितीन वाघ भोयेगाव

4. गट 7 वी व  8 वी 
प्रथम : कार्तिकी निवृत्ती जाधव, भोयेगाव
द्वितीय : सार्थक त्रंबक पवार, भुत्याने 
तृतीय : सत्यम तुकाराम पगार खडक ओझर

      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना माननीय श्री बोडके साहेब यांनी स्वखर्चातून शैक्षणिक साहित्याच्या रूपाने बक्षिस वितरित केले.

Post a Comment

0 Comments