चांदवड-दिघवद येथे सालाबादप्रमाणे रविवार दि. 13 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रेच आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी जगदंबा मातेची भव्य रथ मिरवणुक होऊन रात्री 9वाजता क्रांतीभाऊ सोनवणे जळगावकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडाळाचे आयोजन करण्यात आले आहे. बैल गाडा शर्थत व जंगी कुस्त्याचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. तर दिनांक 15एप्रिलपासुन खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे दत्तात्रय गांगुर्डे व मान्यवरांच्या हस्ते
घट स्थापना करण्यात येणार आहे .तर रोज रात्री वाघ्या मंडळाचे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 15/4/2025 रात्री शिवराम खैरनार सह पार्टी न्हनावे, बुधवारी रात्री मिराबाई चंद्रकांत कावळे पार्टी संभाजी नगर, गुरुवार17रोजी कैलास सूर्यवंशी सह पार्टी हिगनवेढेकर, शुक्रवार 18 रोजी सोमनाथ कांगणे वशिंकदर हिरे पार्टी धारणगाव,शनिवार19रोजी आणा जाधव पार्टी पाटपिंपरीकर यांचे होणार आहे.दि.19रोजी सकाळी काठीरथ मिरवणूक व कावडी मिरवणूक होणार आहेत. संध्याकाळी धनराज एकनाथ माने यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्यात येणार आहे व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रात्री 1ते4वाजता होम,रहाडी होईल.पहाटे माने यांच्या हस्ते लंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल.रविवार रोजी सकाळी आरती व उत्तर पुजाकरणयात येईल या कार्यक्रमाला जयमल्हार भक्त मंडळ व भजणीमंडळ,जय बाबाजी भक्त मंडळ सिध्देश्वर भक्त मंडळ व दिघवद गामस्थ परिश्रम घेणार आहेत.या कार्यक्रमाला बोपाणे,हिवरखेडे उर्धुळ,काजी सांगवी,दहिवद भायाळे,कानमंडाळे,दिघवद गोहरण,निंबोळे,विंचुर,तिसगाव हिरापुर,गणूर,रेडगाव,वडनेर, वडाळी,धोडंबे व चांदवड तालुक्यातील वाघे मंडळ सहकार्य करणार आहे.
Post a Comment
0 Comments